मुंबई - आज (शनिवार) मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 282 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 96 हजारांवर पोहोचला आहे. मृतांपैकी 29 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 27 पुरुष तर 17 महिला रुग्णांचा समावेश आहेत. मृतांचा एकुण आकडा 8 हजार 747 वर पोहोचला आहे.
मुंबईत 2 हजार 282 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा आकडा 1 लाख 96 हजारांवर - मुंबई कोरोनामुक्त बातमी
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शनिवारी 2 हजार 282 नव्या कोरोनास्तांची भर पडली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमधून आज 1 हजार 942 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 58 हजार 749 वर गेला आहे. सध्या मुंबईत 28 हजार 568 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 65 दिवस तर सरासरी दर 1.07 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या 671 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 694 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 70 हजार 626 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -लॉकडाऊनच्या काळात 'बेस्ट'ची मंत्र्यांवर मेहरबानी, विजेची बिलेच पाठवली नाही