मुंबई- मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात आलेल्या विविध धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज शनिवारी (दि.20 सप्टें.) मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 236 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी 5 हजार 38 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत 5038 रुग्णांची कोरोनावर मात, दिवसभरात नवे 2236 रुग्ण, 44 मृत्यू - मुंबई कोरोना आकडेवारी बातमी
मुंबईत 2 हजार 236 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून सध्या 27 हजार 664 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 2 हजार 236 नवे रुग्ण आढळून आले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 33 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 84 हजार 313 वर पोहोचला आहे. तर, एकुण मृतांचा आकडा 8 हजार 466 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 5 हजार 38 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 47 हजार 807 वर गेला आहे. सध्या मुंबईत 27 हजार 664 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवस तर सरासरी दर 1.22 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 609 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 527 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 4 हजार 17 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -आरक्षणाला साथ न देणाऱ्या मराठा आमदार-खासदारांना घरी बसवू; मराठा आंदोलकांचा इशारा