मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर पोलीस कर्तव्य बजावत आहेत. मात्र, राज्य पोलीस दलात कोरोना संक्रमण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासात 2 कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा ५९ वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 2 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, तर 29 जणांना लागण
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1030 कोरोनाबधित पोलिसांवर उपचार सुरू असून यात 117 पोलीस अधिकारी, तर 913 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात 3 पोलीस अधिकारी व 56 पोलीस कर्मचारी, अशा 59 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 37 हजार 583 गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 752 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 290 घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत 860 जणांना अटक करण्यात आली आहे. कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 5 हजार 137 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या 1335 प्रकरणात 28 हजार 008 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 85 हजार 467 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 9 कोटी 52 लाख 30 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 53 घटना घडल्या असून 86 पोलीस जखमी झाले आहेत.