मुंबई - मध्य रेल्वेच्या ताफ्यात दुसरी वातनुकूलित लोकल दाखल झाली आहे. ही लोकलअतिरिक्त लोकल म्हणून वापरण्यात येणार आहे. तर, तिसरी लोकलही शनिवारी आणि रविवारी चालविण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल ३० जानेवारीपासून ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या एसी लोकलच्या १६ फेर्या होत आहेत. वर्षभरात मध्य रेल्वेत एकूण ६ एसी लोकल दाखल होणार आहेत. यात आणखी एक तिसरी एसी लोकल दाखल झाल्यावरच शनिवारी आणि रविवारी चालविण्यात येईल. यामुळे पहिल्या एसी लोकलला मेन्टेनन्ससाठी पाठवून नव्या एसी लोकलद्वारे शनिवार आणि रविवारी फेर्या चालविणे शक्य होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकूण १२ एसी लोकल मुंबईत येणार असून त्यातील ६ एसी लोकल पश्चिम रेल्वेला तर ६ एसी लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत.