महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 2 लाख 26 हजार व्यक्ती क्वारंटाईन तर 557 पोलिसांना कोरोनाची लागण - fir attack on police

राज्यभरात 22 मार्च ते 7 मे या काळात 98 हजार 774 गुन्हे दाखल झाले असून, 19 हजार 82 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 653 जणांवर राज्यात कारवाई करण्यात आली आहे.

policemen were infected with corona
राज्यात 2 लाख 26 हजार व्यक्ती क्वारंटाईन तर 557 पोलिसांना कोरोनाची लागण

By

Published : May 8, 2020, 4:52 PM IST

मुंबई - राज्यात लॉकडाऊन काळात 22 मार्च ते 7 मेपर्यंत तब्बल 2 लाख 26 हजार 236 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी तब्बल 3 लाख 15 हजार 434 जणांना पास देण्यात आले आहेत. राज्य पोलीस खात्यातील 557 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, यात 62 पोलीस अधिकारी आणि 495 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईत 3 पोलिसांचा तर पुण्यात 1, सोलापुरात 1 अशा 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात 22 मार्च ते 7 मे या काळात 98 हजार 774 गुन्हे दाखल झाले असून, 19 हजार 82 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 653 जणांवर राज्यात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 190 घटना घडल्या असून, या प्रकरणी 686 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि मेडिकल पथकावर हल्ला झाल्याचे 30 गुन्हे घडले असून 73 पोलीस कर्मचारी आणि 1 होमगार्ड असे 74 जण जखमी झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात पोलिसांवर हल्ल्याचे 143 गुन्हे घडले असून, जालना जिल्ह्यातून 46 तर साताऱ्यात 25 गुन्हे घडले आहेत. हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, गोंदिया सारख्या जिल्ह्यात कुठेही पोलिसांवर हल्ला झाल्याचे गुन्हे दाखल नाहीत.

राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण क्रमांकावर आतापर्यंत 86 हजार 246 फोन आले आहेत. अवैध वाहतूक संदर्भात 1 हजार 286 गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल 54 हजार 148 वाहन जप्त करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details