मुंबई - विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत आहे. आज महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अर्ज दाखल केले गेले, तर भाजपकडून चार उमेदवारांसह आज आणखी दोन उमेदवारांचे डमी अर्जही दाखल केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून याआधी चार उमेदवारांनी अर्ज भरले, तर आज भाजपकडून आणखी दोन उमेदवार अर्ज दाखल केला आहे. भाजपचे नेते संदीप लेले आणि रमेश कराड यांनी आज अर्ज दाखल केले. विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्जात कोणती चूक झाली अथवा काही अडचणीमुळे अर्ज बाद झाला, तर त्यासाठी खबरदारी म्हणून हे दोन डमी उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली आहे.