महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : गोवंडीतून दोन ड्रग्स तस्करांना अटक, 23 लाखांचा एमडी जप्त - 2 drugs peddlers arrested

मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 91 लाख रुपयांचा ड्रग्ज जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही इसमांकडे मिळून आलेल्या एकूण ११६ ग्रॅम “एम.डी." (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे अंदाजे रुपये २३ लाख २० हजार एवढे मूल्य आहे.

Mumbai Crime
दोघांना अटक

By

Published : Jan 22, 2023, 10:12 PM IST

मुंबई :अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिट यांनी शिवाजीनगर, मुंबई परिसरामधून अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्या दोन आरोपीकडून ११६ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत रुपये २३ लाख २० हजार आहे. एक आरोपी 27 वर्षांचा असून दुसरा आरोपी 37 वर्षांचा आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षे आरोपीकडून ५६ ग्रॅम 'एम.डी." (मेफेड्रॉन ) जप्त करण्यात आला आहे. या अंमली पदार्थाची किंमत 99 लाख आहे. तर 37 वर्षे आरोपीकडून आरोपी ६० ग्रॅम "एम.डी." (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले याची किंमत 92 लाख रुपये असून एकूण 1 कोटी 91 लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.


संशयावरून अटक केली अन् :वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, मुंबईचे पथक पूर्व प्रादेशिक विभागामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा 21 जानेवारीला गस्तीदरम्यान शोध घेण्यात आला. यावेळी डंपींग वॉल कंपाउन्ड जवळ, बैंगनवाडी, गोवंडी या ठिकाणी २७ वर्षे वयाच्या एक संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे ५६ ग्रॅम 'एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्याच्याविरुद्ध कलम ८ (क) सह २२ (क) एन. डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.


दुसऱ्याही आरोपीला अटक :त्यानंतर पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे अंमली पदार्थ त्याने कोणाकडून घेतला याबाबत चौकशी केली असता त्याने टायगर फिटनेस क्लब जवळ दुसरा इसम गुन्ह्यात सहभागी असल्याचे. या इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे ६० ग्रॅम "एम.डी. ' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या दोन्ही इसमांकडे मिळुन आलेल्या एकुण ११६ ग्रॅम “एम.डी." (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे अंदाजे रुपये २३ लाख २० हजार एवढे मूल्य आहे.


या पोलिसांनी बजावली कामगिरी :ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, सावळाराम आगवणे यांच्या तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम आणि पोलीस पथक यांनी पार पाडली असून गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम हे करीत आहेत.

हेही वाचा :Pune Crime : नात्याला काळीमा! भावाच्या मुलींवर केला अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details