मुंबई : मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year celebrations) प्रवाशांना रात्रभर बेस्ट उपलब्ध (Best Buses available all night) करण्यात आल्या. तसेच प्रवाशांनी दुमजली ओपन डेक बसचीही (open deck bus) मजा घेतली. यंदा आठवडाभर आधीच झालेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईतील विविध भागात ३१ डिसेंबर २०२२ रोजी मागील वर्षांपेक्षा दुप्पट म्हणजेच एकूण ५० जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. पहाटेपर्यंत १५७८ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामध्यामातून बेस्टला २ लाख ३९ हजार ९५० रुपये महसूल मिळाला आहे.
१५७८ प्रवाशांनी केला प्रवास : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आदी ठिकाणी जातात. अशा ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांसाठी बेस्टने रात्रभर अतिरिक्त ५० बसेस चालवल्या होत्या. तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ५ ओपन डेक बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणल्या. शनिवारी रात्री १२ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत ओपन डेक बसच्या एकूण ३९ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यातून १५७८ प्रवाशांनी प्रवास केला असून बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत २ लाख ३९ हजार ९५० रुपये महसूल जमा झाला आहे.