मुंबई -वरळी प्रेम नगर बी जी खेर मार्ग येथील निर्माणाधीन असलेल्या अविघ्न टॉवर या इमारतीची लिफ्ट साडे चार वाजण्याच्या सुमारास ( elevator unbroken tower collapsed ) कोसळली. या दुर्घटनेत २ कामगार जखमी झाले आहेत. या जखमींना पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू ( Two people died due to lift collapse ) झाल्याची माहिती नायर रुग्णालयाने दिली आहे.
Elevator Collapsed : वरळीत लिफ्ट कोसळून २ जणांचा मृत्यू, अपघाती मृत्यूची नोंद - Elevator Collapsed
अविघ्न टॉवर या इमारतीची लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू ( elevator unbroken tower collapsed ) झाला आहे. दोन्ही कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ( Municipal Emergency Management Department ) दिली आहे. ही इमारत 19 मजली उंच असून काच साफ करताना दोन कामगार लिफ्टसह 16व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.
वरळी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ते ज्या ट्रॉलीमध्ये होते ती अनपेक्षितपणे जमिनीवर पडली. ती ट्रॉली इमारतीच्या टेरेसला जोडलेले होती. परंतु काही कारणास्तव वजन पेलता आले नाही. या अपघातामागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे, असे पुढे पोलीस म्हणाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉली जोरात जोरात जमिनीवर कोसळली. नूर आलम (27) आणि जमील अहमद (30) अशी या दोन मृत मजुरांची नावे आहेत. मजुरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते, त्यानेच हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला दिले होते, असेही ते म्हणाले. पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तज्ञांकडून तांत्रिक तपासणी अहवाल आल्यानंतरच एफआयआर दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
16व्या मजल्यावरून पडून मृत्यू- वरळीतील अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत हा अपघात झाला. ही इमारत 19 मजली उंच असून काच साफ करताना दोन कामगार लिफ्टसह 16व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. वरळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून माहितीनुसार, या १९ मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याचे काम सुरू आहे. लिफ्ट बसवताना हा अपघात झाला. लिफ्टमध्ये आणखी लोकइमारतीच्या २३व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली - या इमारतीच्या बांधकामाधीन लिफ्टमध्ये दोन कामगार लिफ्टच्या ट्रॉलीच्या साहाय्याने काच साफ करत असताना लिफ्ट कोसळली. या लिफ्ट ट्रॉलीमध्ये काम करणारे दोघेजण लिफ्टसह सोळाव्या मजल्यावरून जमिनीवर पडले. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आठवडाभरापूर्वी अशीच एक घटना मुंबईतील विक्रोळी येथे घडली होती आणि त्या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. मुंबईतील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची पार्किंग लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ४ जानेवारी रोजी घडली