नवी मुंबई:रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नवी मुंबईतील तळोजा जेल (Taloja Jail) येथे भेट देत येथील सोयी सुविधांची पाहणी केली व तळोजा जेलच्या सुरक्षेसाठी २ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.
Uday Samant: तळोजा जेलच्या सुरक्षेसाठी उदय सामंत यांच्याकडून २ कोटीचा निधी - तळोजा जेल
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नवी मुंबईतील तळोजा जेल (Taloja Jail) येथे भेट देत येथील सोयी सुविधांची पाहणी केली व तळोजा जेलच्या सुरक्षेसाठी २ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.
तळोजा जेल मध्ये कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न:रायगड जिल्ह्याचे पालाकमंत्री उदय सामंत यांनी तळोजा जेल मध्ये भेट देत येथील सोयी सुविधांची पाहणी केली. या मध्ये कैद्यांसाठी असलेल्या कॅटींग, बॅरेकेट, तांत्रिक अवजारे यांची कमतरता असल्याचे समोर आले. याबाबत तळोजा जेलचे जेलर यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. तळोजा जेल मध्ये १७०० कैद्यांची क्षमता असली तरी जवळपास अडीच हजार कैदी येथे ठेवण्यात आले आहेत. या मध्येही अनेक राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील व्हीआयपी कैदी असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले आहेत.