मुंबई- बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये तब्बल 2 लाख 95 हजार रुपयांच्या 590 नोटा जप्त केलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी स्वतःच नोटा छापून बाजारात पसरवण्याच्या प्रयत्नात होते. ते मुंबईतील विरा देसाई रोड या ठिकाणी बनावट नोटा घेऊन येणार होते. मात्र, याआधीच गुन्हे शाखेने त्यांचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात अद्याप अजून एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यानेच या सगळ्या प्रकरणात मदत केल्याचे उघड झाले आहे. फरार आरोपी बनावट नोटा बनवण्याच्या प्रकरणात मास्टरमाईंड आहे.
हेही वाचा -राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी?