महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - LATEST NEWS

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून व्यक्त केला आहे...औरंगाबादमधील अभिनव इंटरनॅशनल स्कुलला अज्ञात व्यक्तीने लावली आग...चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत गावकऱ्यांनी केली डॉक्टर मारहाण. त्यामुळे डॉक्टर पुन्हा संपावर गेले आहेत...सोन्यात जीव रंगल्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याला २१ जूनपर्यंत कोठडी...

बातमी, सर्वांच्या आधी

By

Published : Jun 19, 2019, 9:00 AM IST

आगामी विधानसभा 'भगवी' करून शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान करू - उद्धव ठाकरे

मुंबई - भाजपशी ‘युती’ असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा ‘भगवी’ करून शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना पक्षस्थापनेला १९ जून २०१९ ला ५३ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून हा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर -

औरंगाबादमधील अभिनव इंटरनॅशनल स्कुलला अज्ञात व्यक्तीने लावली आग; तपास सुरू

औरंगाबाद - अनोळखी व्यक्‍तींनी चिकलठाणा येथील अभिनव इंटरनॅशनल स्कूलला आग लावल्याची घटना मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. आग लावण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. वाचा सविस्तर -

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, गावकऱ्यांनी मारहाण केल्याने डॉक्टर पुन्हा संपावर

नवी दिल्ली - दिल्लीत डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. दिल्लीजळील बवना परिसरातील महर्षी वाल्मिकी रुग्णालयात मंगळवारी रात्री हा प्रकरा घडला. या घटनेमुळे डॉक्टरांच्या फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेने संप पुकारला आहे. वाचा सविस्तर -

सोन्यात जीव रंगल्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याला २१ जूनपर्यंत कोठडी

पुणे - औंध येथील 'पीएनजी ब्रदर्स' या ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाचा सविस्तर -

पाण्यात उडणाऱ्या माशांच्या व्हायरल व्हिडिओमागील 'हे' आहे सत्य...

रत्नागिरी - सध्या एका माशांच्या व्हिडिओची चर्चा सर्वत्र रंगली आहे. पावसाळ्यात कोकणात चढणीचे मासे खाण्याची पर्वणी असते. हे चढणीचे मासे पकडण्याची एक पद्धत असते. अशाचप्रकारे मासे पकडत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदीच्या प्रवाहात हजारो मासे पाण्यावर उड्या मारताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाहूया या व्हायरल व्हिडिओमागील सत्य... वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी

ABOUT THE AUTHOR

...view details