मुंबई -देशात कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या आणि खासगी अशा एकूण १९ रुग्णालयांत कोरोनाची तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता पालिकेच्या रुग्णालयात मोफत चाचण्या होणार असून खासगी रुग्णालयात त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
कोरोनाच्या रुग्णांवर मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने पालिकेने आपल्या इतर रुग्णालयांत उपचार आणि चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यास अनेक नागरिक तयार नसल्याने पालिकेने अशा नागरिकांच्या सोयीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा -COVID - 19 LIVE : राज्यात १२४ रुग्ण, तर श्रीनगरमध्ये एकाचा बळी..
फोनवरून मार्गदर्शन -
ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील, त्यांना दूरध्वनीद्वारे घरबसल्या महानगरपालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने '०२०-४७०८५०८५' हा दूरध्वनी क्रमांकावर उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधी दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे आणि संपर्क क्रमांक -
१. सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२-६१७०-००१९
२. थायरोकेअर : ९७०२-४६६-३३३
३. मेट्रोपोलीस: ८४२२-८०१-८०१
४. सर एच. एन. रिलायन्स : ९८२०-०४३-९६६
५. एसआरएल लॅब
१९ रुग्णालयांची नावे -
पालिकेची रुग्णालये -
१. 'केईएम सर्वोपचार रुग्णालय'
२. 'लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय'
३. नायर रुग्णालय
४. कूपर रुग्णालय
५. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालय
६. 'भाभा रुग्णालय', वांद्रे
७. 'भाभा रुग्णालय', कुर्ला
८. 'राजावाडी रुग्णालय', घाटकोपर
खासगी रुग्णालये -
९. ब्रिच कॅंडी रुग्णालय
१०. एच. एन. रिलायन्स रुग्णालय
११. लीलावती रुग्णालय
१२. रहेजा रुग्णालय
१३. हिंदुजा रुग्णालय
१४. फोर्टिस रुग्णालय
१५. बॉम्बे हॉस्पिटल
१६. वोक्हार्ट रुग्णालय
१७. कोकीळाबेन रुग्णालय
१८. नानावटी रुग्णालय
१९. हिरानंदानी रुग्णालय