महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2020, 10:33 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत आढळले 1 हजार 854 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण

मुंबईत आज (26 ऑगस्ट) कोरोनाचे 1 हजार 854 नवे रुग्ण आढळून आले असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 39 हजार 532 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 502 वर पोहोचला आहे.

edited news
संपादित छायाचित्र

मुंबई - मुंबईत बुधवारी (26 ऑगस्ट) 1 हजार 854 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या वेबसाईटवर काल (मंगळवार) खासगी लॅब आणि सरकारी लॅबकडून पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी अपडेट झाली नसल्याने आज रुग्णांचा आकडा वाढला आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 854 नवे रुग्ण आढळून आले असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 39 हजार 532 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 502 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 776 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 12 हजार 743 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 977 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज (बुधवार) 28 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 22 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 19 पुरुष तर 9 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज (26 ऑगस्ट) 776 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 12 हजार 743 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 39 हजार 543 रुग्ण असून 1 लाख 12 हजार 743 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 502 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 18 हजार 977 सक्रिय रुग्णांवर मुंबईतील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 93 दिवस तर सरासरी दर 0.75 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 575 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 666 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 7 लाख 25 हजार 519 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -मुंबई : फोर्ट येथील बाहुबली इमारतीला आग; एक जण भाजला

ABOUT THE AUTHOR

...view details