महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 183 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू - कोरोना अपडेट महाराष्ट्र

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात 150 ते 200 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत नव्याने 183 रुग्ण आढळून आले आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचे 183 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाचे 183 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

By

Published : Apr 15, 2020, 7:57 PM IST

Updated : Apr 15, 2020, 8:23 PM IST

मुंबई - गेल्या 24 तासात मुंबईत कोरोनाचे 183 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 02 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांचा एकूण आकडा 1 हजार 936 वर, तर मृतांचा आकडा 113 वर पोहोचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात 150 ते 200 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत नव्याने 183 रुग्ण आढळून आले आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 मृत्यूपैकी 1 रुग्णाला इतर दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पाच ते 14 एप्रिल दरम्यान ज्या विभागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या विभागात इतर कोणी रुग्ण आहेत का? याचा शोध घेण्यासाठी 100 क्लिनिकच्या माध्यमातून 3 हजार 929 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 541 संशयितांचे नमुने घेण्यात आले. 14 एप्रिलपर्यंत 33 हजार 636 इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Apr 15, 2020, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details