मुंबई -विक्रोळीत अठराशे किलो गांजा जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. महत्वाचे म्हणजे, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा करण्यात येत होता.
माहिती देताना मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे हेही वाचा -'जलजीवन मिशन' अंतर्गत माफक दरात पाणी तपासणी सुविधा होणार - गुलाबराव पाटील
मुंबई पोलिसांनी अशा एका गँगचा पर्दाफाश केला आहे, जी दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करत होती. काही लोक गांजा मुंबईत पोहचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर पथकाने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे महामार्गावर सापळा रचून एका ट्रकला अडवले. त्यात नारळ भरले होते. तपासात आरोपींनी नारळांच्या खाली एक कॅविटी बनवली होती, त्यात 1 हजार 800 किलो गांजा लपवण्यात आल्याचे आढळले. जप्त केलेल्या गांजाची किंमत साडे तीन कोटी रुपये आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात पोलिसांनी आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे. आकाश यादव विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस सध्या संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान यांचा शोध घेत आहे. संदीप सातपुते हा भिवंडीतील एका गोदामाचा मालक असून तो ठाण्याच्या लुईस वाडी परिसरात राहतो. तो जवळपास पाच वर्षांपासून अशाच प्रकारे गांजाचा पुरवठा करत आहे.
हेही वाचा -मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 किलो 200 ग्रॅम चरस जप्त