महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : रविवारी 18 हजार बाधितांची नोंद; 13565 कोरोनामुक्त - maharashtra corona total patient

राज्यात रविवारी 18 हजार 56 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 13 हजार 565 जणांनी कोरोनावर मात केली.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Sep 28, 2020, 12:37 AM IST

Updated : Sep 28, 2020, 2:14 AM IST

मुंबई - राज्यात रविवारी 18 हजार 56 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 380 बाधितांचा मृत्यू झाला. राज्यात अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी राज्यात 18 हजार 56 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. तर 380 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की, रविवारी 13 हजार 565 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 13 लाख 39 हजार 232 इतकी झाली आहे. यात 35 हजार 571 मृतांचा समावेश आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 10 लाख 30 हजार 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात सध्या 2 लाख 73 हजार 228 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.66 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 65 लाख 65 हजार 649 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 13 लाख 39 हजार 232 म्हणजेच 20.40 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 64 हजार 644 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 30 हजार 467 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

रविवारी नोंद झालेल्या एकूण 380 मृत्यूंपैकी 200 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 96 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 84 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 84 मृत्यू ठाणे - 15, चंद्रपूर - 13, कोल्हापूर - 10, पुणे - 10, सातारा - 9, सांगली - 7, अहमदनगर - 6, रत्नागिरी - 3, नागपूर - 2, नांदेड - 2, भंडारा - 1, जळगाव - 1, नंदूरबार -1, उस्मानाबाद - 1, परभणी - 1, यवतमाळ - 1 आणि कर्नाटक - 1 असे आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 58 हजार 932 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात सध्या 29 हजार 975 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 26 हजार 716 वर पोहोचला आहे. मुंबई पालिका हद्दीत असलेल्या विविध रुग्णालयांतून रविवारी 4 हजार 190 रुग्णांनी मात केली. तर दिवसभरात 2 हजार 261 नविन रुग्णांचे निदान झाले. तसेच 44 बाधितांचा मृत्यू झाला.

Last Updated : Sep 28, 2020, 2:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details