मुंबई- दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा 18 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
मुंबईत 16 हजाराहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. या सर्व इमारती धोकादायक असून या इमारतीतील अनेक इमारती पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून या इमारतींची नियमित दुरुस्ती केली जाते. तर पावसाळ्याआधी या इमारतींचे सर्व्हेक्षण करत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ज्या इमारतींना पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो त्या इमारतींचा यात समावेश असतो.
दरवर्षी ही यादी 15 मे च्या आत जाहीर करत 6 जूनपर्यंत रहिवाशांचे स्थलांतर करत इमारती मोकळ्या केल्या जातात. पण यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या यादीला विलंब झाला आहे. त्यानुसार आज ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आता ही यादी प्रसिद्ध करत रहिवाशांना नोटीस पाठवत इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
अतिधोकादायक इमारतींची यादी पुढील प्रमाणे आहे
1) बिल्डिंग नं- 144 एक्सपलेंड मेंशन, एम.जी. रोड
2) बिल्डिंग नं- 50-58 एम.ए. सारंग स्ट्रीट, नागपाडा, क्रॉस लेन
3) बिल्डिंग नं-101-111, बारा इमाम रोड
4) बिल्डिंग नं-74, निझाम स्ट्रीट
5) बिल्डिंग नं- 123, किका स्ट्रीट
6) बिल्डिंग नं- 242-244, बारा इमाम रोड
7) बिल्डिंग नं-166 डी, मुंबादेवी रोड