मुंबई :अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 177 कोटींचा निधी जाहीर केला आहे. हा निधी विभागनिहाय आहे. याची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, पुणे विभागाला 5 कोटी 37 लाख 70 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिक विभागाला 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाला 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर, अमरावती विभागाला 24 कोटी 57 लाख 95 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे ही एकूण रक्कम 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांची आहे.
जिल्हानिहाय निधी वितरित : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा सभागृहात उचलून धरला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. तसे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांची रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात येईल.