मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज कोरोनाचे 1751 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा आकडा 27068 वर पोहोचला आहे, तर आज २७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 909 वर पोहोचला आहे. तसेच 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7080 वर पोहोचली आहे.
मुंबईत आज कोरोनाचे 1751 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 27 हजारांवर - मुंबई कोरोना पॉझिटिव्ह केसेस
मुंबईत कोरोनाचे नवे 1751 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1475 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले, तर 17 मे रोजी खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 276 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत कोरोनाचे नवे 1751 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1475 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले, तर 17 मे रोजी खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 276 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत आज 27 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 22 जणांना दिर्घकालीन आजार होते. 27 मृतांपैकी 18 पुरुष, तर 9 महिला रुग्ण होते. मृतांपैकी एकाचे वय 40 वर्षाखाली, 13 जणांचे वय 60 वर्षावर, तर 13 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईमधून गेल्या 24 तासात 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 7080 वर पोहोचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.