मुंबई -राज्यात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. गेल्या काही दिवसात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मात्र, दिवसात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र, कमी होताना दिसत नाही. दिवसाला राज्यभरात 300 हून अधिक रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे.
दिलासादायक.. राज्यात आतापर्यंत १२ लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांहून अधिक - maharashtra corona total patients
राज्यात आज (शुक्रवारी) 17 हजार 323 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 12 हजार 134 नविन रुग्णांची नोंद करण्यात झाली. तर 302 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
राज्यात आज (शुक्रवारी) 17 हजार 323 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 12 हजार 134 नविन रुग्णांची नोंद करण्यात झाली. तर 302 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 12 लाख 29 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.63 टक्के इतके आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या 2 लाख 36 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 74 लाख 87 हजार 383 नमुन्यांपैकी 15 लाख 6 हजार 18 नमुने म्हणजेच 20.11 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 588 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 24 हजार 792 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी 302 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या 39,732 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के इतका आहे.