महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे आज 1725 नवे रुग्ण; एकूण रुग्णांचा आकडा 30 हजारांवर - मुंबई कोरोना न्यूज

मुंबईमधून 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 8074 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत कोरोनाचे आज 1725 नवे रुग्ण; मुंबईतील रुग्णांचा आकडा 30 हजारांवर
मुंबईत कोरोनाचे आज 1725 नवे रुग्ण; मुंबईतील रुग्णांचा आकडा 30 हजारांवर

By

Published : May 24, 2020, 10:43 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणुचे नवे 1725 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30,359 वर पोहोचला आहे, तर मुंबईत झालेल्या 39 मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 988 वर पोहचला आहे. मुंबईमधून 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 8074 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत कोरोना विषाणुचे नवे 1725 रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 1366 रुग्ण मागील 24 तासात तर 359 रुग्ण 21 व 22 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. 39 मृतांपैकी 24 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. 39 मृतांपैकी 20 पुरुष तर 19 महिला रुग्ण होत्या. मृत रुग्णांपैकी 16 जणांचे वय 60 वर्षांवर होते तर 23 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत 8074 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details