महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात २४ तासात १७ हजार नवे कोरोनाबाधित, ५१५ बाधितांचा मृत्यू

कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ हजार अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ५१५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांची संख्या ही ३० हजार ४०१ वर पोहोचली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Sep 15, 2020, 9:35 PM IST

मुंबई- देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. रुग्णांची संख्या कमी होण्या ऐवजी ती वाढतच आहे. काल १७ हजार ६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर, त्यात वाढ होऊन गेल्या २४ तासात राज्यात २० हजार ४८२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ हजार अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ५१५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांची संख्या ही ३० हजार ४०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९ हजार ४२३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६३ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम महत्त्वाचे शस्त्र ठरेल

ABOUT THE AUTHOR

...view details