महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडाने नोटीस दिलेली इमारत कोसळली, १७ जणांना सुखरूप बाहेर काढले - इमारत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या युसूफ मंजिल इमारतीचा काही भाग कोसळला. त्यातील १७ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे.

बचावकार्य करताना

By

Published : Sep 11, 2019, 8:33 AM IST

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या युसूफ मंजिल इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात ६ ते ७ जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. दरम्यान ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते त्यांनाही बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत एकूण १७ जणांना बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर लोहार चाळ आहे. या ठिकाणी म्हाडाची उपकरप्राप्त युसूफ मंजिल ही तीन मजली इमारत आहे. इमारत जुनी असल्याने या इमारती काही लोक राहत होते. रात्री ९.१५ च्या सुमारास या इमारतीचा मागील बाजूचा काही भाग कोसळला. इमारतीला लागून असलेल्या द्वारकादास या इमारतीच्या प्रवेशद्वारावर कोसळला. यामुळे ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अडकले. अडकलेल्या ६ ते ७ रहिवाशांना येथील स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्याचे शमशाद खान यांनी सांगितले.

हेही वाचा - 10 जागा द्या अन्यथा स्वबळावर, महाराष्ट्र क्रांतीसेनेचा भाजपला इशारा

दरम्यान, इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिस, अग्निशमन दल, पालिका कर्मचारी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहेत का याचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी दोघे ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधकार्यादरम्यान एकूण १७ जणांना बाहेर काढले. त्यापैकी १३ जणांना तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून, २ जणांना दुसऱ्या मजल्यावरून तर एका ८० वर्षीय महिलेला खुर्चीसह बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

म्हाडाची नोटीस


युसूफ मंजिल इमारत धोकादायक असल्याने म्हाडाकडून इमारत रिकामी करण्याची नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार अनेक रहिवाशी इतर ठिकाणी राहण्यास गेले होते. मात्र, त्यानंतरही काही रहिवाशी अद्याप या इमारतीमध्ये राहत होते. इमारत कोसळली त्यावेळी यापैकी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना स्थानिक रहिवाशी व अग्निशमन दलाच्या जवनांनी सुखरुप बाहेर काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details