महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळीत बेस्ट बसला अपघात; १७ जण जखमी - विक्रोळी बेस्ट बस अपघात न्यूज

विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात १७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर द्रुतगती मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

BEST Bus
बेस्ट बस

By

Published : Oct 17, 2020, 1:20 PM IST

Updated : Oct 17, 2020, 2:49 PM IST

मुंबई -पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात झाला. ही बस भांडुपवरून वरळीकडे निघाली होती. बसमध्ये 20 ते 22 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात बस चालकासह १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अपघात झालेली बेस्ट बस

काही दिवसांपूर्वीच बेस्टने मुंबईच्या सेवेसाठी मिनी बसेस सुरू केल्या आहेत. आज एक मिनी बस भांडूपवरून वरळीला निघाली. बस विक्रोळी उड्डाणपुलाजवळ येताच एका मोटरसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक सिराज पाटण यांचे बसवरून नियंत्रण सुटले व बस दुभाजकाला धडकली. या अपघातानंतर द्रुतगती मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

Last Updated : Oct 17, 2020, 2:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details