महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रासपचे सोळावे वर्ष राष्ट्रवादीसह बारामतीसाठी धोक्याचं - पंकजा मुंडे

राष्ट्रीय समाज पक्षाला सोळा वर्षे पूर्ण झाले आहेत. हे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीतील सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

रासपाचे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीसाठी धोक्याचे - पंकजा मुंडे

By

Published : Aug 25, 2019, 7:57 PM IST

मुंबई -राष्ट्रीय समाज पक्षाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीतील सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. दादर येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

रासपचे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीसाठी धोक्याचे - पंकजा मुंडे

एक सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा ते एका पक्षाचा प्रमुख, हा प्रवास कठीण आहे. म्हणून, खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस कुणी असेल तर ते महादेव जानकर आहेत, असेही मुंडे म्हणाल्या. मोदींप्रमाणे लग्न न करता देशालाच परिवार मानन्याचा सल्लादेखील त्यांनी यावेळी जानकरांना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details