मुंबई -तलावात पोहत असताना एक मित्र पाण्यात बुडत होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) पवई येथील तलावात घडली आहे.
पोहता येत नसातानाही मित्राला वाचवण्यासाठी तलावात गेलेल्या सत्यमचा बुडून मृत्यू - जलपर्णी
सत्यम गुप्ता (रा. विक्रोळी) याला आपला एक मित्र पाण्यात बुडत असल्याचे दिसले. सत्यम पोहता नाही तरीही मित्राला वाचवण्यासाठी तो पाण्यात उतरला. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात गेला.
![पोहता येत नसातानाही मित्राला वाचवण्यासाठी तलावात गेलेल्या सत्यमचा बुडून मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3917319-thumbnail-3x2-pawai.jpg)
आज (सोमवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान काही तरुण पवई तलावात सांडव्याच्या बाजूने पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते . हे युवक विक्रोळी येथून आले होते. यातील एक तरुण सत्यम गुप्ता (रा. विक्रोळी) याला आपला एक मित्र पाण्यात बुडत असल्याचे दिसले. सत्यम पोहता नाही तरीही मित्राला वाचवण्यासाठी तो पाण्यात उतरला. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात गेला. जलपर्णींच्या संपर्कात आल्याने त्याला काहीही हालचाल करता आली नाही. यामुळे सत्यम पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सत्यम गुप्ताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. पवई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
मुंबईत मागील काही आठवड्यात चांगला पाऊस झाला. यामुळे पवई येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तलावात पाणीसाठा मोठया प्रमाणात असल्याने काही तरुण तलाव पाहण्यासाठी आणि पोहण्यासाठी येत आहेत.