महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai suicide: धक्कादायक! वडील फक्त ओरडले; 16 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - धक्कादायक घटना

मुंबईत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी हा गुरुनानक कॉलेजमध्ये शिकत होता. तर 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai suicide
इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

By

Published : Aug 9, 2023, 11:07 PM IST

मुंबई : आज सायन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 16 वर्षीय मुलाचे इतर मुलांनसबोत भांडण झाले होते. त्यामुळे वडीलांनी त्याला ओरडले होते. रागातून मुलाने इमारतीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

5 व्या मजल्यावरील फ्लॅटवरून घेतली उडी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा नगर बिल्डींग नंबर 18 मधील त्याच्या 5 व्या मजल्यावरील फ्लॅटवरून मुलाने उडी मारली. त्याचवेळी आई आणि बहिणी त्याला उडी न मारण्यासाठी ओरडत होते. सायनमधील गुरू नानक कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या 16 वर्षीय मुलाला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तर मुलाचे वडील संजय भोसले हे जे बीएमसी एल वॉर्ड ऑफिस कुर्ला येथे अधिकारी आहेत. त्यांनी काही अज्ञात कारणास्तव मुलाला फटकारले होते.

पोलिसांचा तपास सुरू :याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी ) पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडाळा टीटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर अरगडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आम्ही अधिक तपास करत आहोत. मृत मुलाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. पण कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.अल्पवयीन मुलाच्या अचानक झालेल्या जीवघेण्या कृत्याच्या सर्व पैलूंचा तपास पोलिस करत आहेत. तसेच पोलिसांचे एक पथक त्याच्या कॉलेज आणि त्याच्या मित्रांची चौकशी करण्यासाठी गेले आहे. मात्र मुलाच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

अशीच आणखी एक घटना :मुंबईतील केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या एका डॉक्टरने शिवडीच्या टीबी रूग्णालयात रात्री इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. आदिनाथ पाटील हा मूळचा जळगावचा असून तो एमडी मेडिसीनचे वैद्यकीय शिक्षण घेत होता.

हेही वाचा -

  1. Dhanbad Student Suicide : शिक्षिकेने थोबाडीत मारली म्हणून 17 वर्षीय मुलीने केली आत्महत्या
  2. Suicide Of Teacher : 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी घेतला दुसऱ्या शाळेत प्रवेश निराश शिक्षकाची आत्महत्या
  3. Mumbai suicide : धक्कादायक! केईएम रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टराने केली आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details