मुंबई - राज्यातील कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ४९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील ३४, पुण्यात ६, अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये २, धुळ्यात २, पनवेलमध्ये १, जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)
ठाणे: १८९ (३)
ठाणे मनपा: १३०२ (११)
नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)
उल्हासनगर मनपा: ८६
भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २६० (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: ३२१ (११)
रायगड: २१२ (२)
पनवेल मनपा: १८० (१०)
ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)
नाशिक: ९९
नाशिक मनपा: ६३
मालेगाव मनपा: ६६३ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६४ (५)
जळगाव: १९० (२३)
जळगाव मनपा: ५६ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)
पुणे: १८५ (५)
पुणे मनपा: ३१४१ (१७२)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३५६ (२०)
सातारा: १२६ (२)
पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३७
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८६ (३)