मुंबई -राज्यात आज (शुक्रवारी) कोरोना विषाणूची लागण झालेल्या १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ लाख १६ हजार ५१३वर पोहचला आहे. तर एकूण मृतांची संख्या ३७ हजार ४८० इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के तर मृत्यूचा दर २.६५ टक्के इतका आहे.
महाराष्ट्र कोरोना अपडेट : १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान, ४२४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ म्हणजेच २०.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
यासोबतच राज्यभरातून आज १३ हजार २९४ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामुळे आजपर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ११ लाख १७ हजार ७२०वर पोहचला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ म्हणजेच २०.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २१ लाख ९४ हजार ३४७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर २९ हजार ५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
८७ मृत्यू पुढीलप्रमाणे - ठाणे -५, पुणे -७, नाशिक -६, कोल्हापूर -३, पालघर -२, चंद्रपूर-२, जळगाव-१, सातारा -३२, नागपूर-१४, रत्नागिरी -१, सिंधुदूर्ग-१, वर्धा-१, सांगली -२, मध्य प्रदेश-१.
आज निदान झालेले रुग्ण आणि मृत्यू (कंसात)-
मुंबई मनपा-२४४० (४२), ठाणे- २७० (३), ठाणे मनपा-३५८ (२), नवी मुंबई मनपा-३८८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३२१ (१), उल्हासनगर मनपा-४६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-४७ (२), मीरा भाईंदर मनपा-२४० (१), पालघर-१५९ (४), वसई-विरार मनपा-१४५ (६), रायगड-२६२ (३), पनवेल मनपा-२६१ (), नाशिक-२३९ (१३), नाशिक मनपा-६९२ (११), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-५१० (३), अहमदनगर मनपा-११० (१), धुळे-४३ (१), धुळे मनपा-४३ (१), जळगाव-१७५ (४), जळगाव मनपा-१७३ (१), नंदूरबार-३८ (१), पुणे- ८९६ (२०), पुणे मनपा-१०४३ (१८), पिंपरी चिंचवड मनपा-५९९ (८), सोलापूर-२९१ (१५), सोलापूर मनपा-६३ (५), सातारा-७५७ (४२), कोल्हापूर-२४९ (५), कोल्हापूर मनपा-६४ (२), सांगली-३८४ (१५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१३९ (५), सिंधुदूर्ग-६७ (४), रत्नागिरी-११६ (४), औरंगाबाद-१२० (०),औरंगाबाद मनपा-२७८ (१), जालना-३५, हिंगोली-३३ (३), परभणी-३९, परभणी मनपा-२७ (१), लातूर-१३७ (४), लातूर मनपा-९४ (२), उस्मानाबाद-१६० (८), बीड-२१३ (४), नांदेड-८० (१), नांदेड मनपा-४९ (२), अकोला-४२ (१), अकोला मनपा-४८, अमरावती-८४, अमरावती मनपा-१२९, यवतमाळ-८१ (५), बुलढाणा-२४६ (१), वाशिम-११०, नागपूर-३५४ (११), नागपूर मनपा-६४६ (१८), वर्धा-१४९ (३), भंडारा-१४६ (७), गोंदिया-९४ (२), चंद्रपूर-१३० (१), चंद्रपूर मनपा-१५४ (३), गडचिरोली-१४३, इतर राज्य-२७ (२).