मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 15 नवे रुग्ण आढळले. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 123 झाली आहे. यात मुंबईमधील 88 तर मुंबई बाहेरील 35 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईमधील 5 तर मुंबई बाहेरील 2 अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे.
मुंबई परिसरात मागील 24 तासात 357 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 93 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून 15 जणांच्या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 6 पुरुष आणि 9 महिला आहेत. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.