मुंबई:मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले, यात शिवसेनेच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि विद्यमान परस्थितीवर भाष्य करत भाजपला टार्गेट करत टीका केली. यावेळी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, मंत्री आदित्य ठाकरे 10 जुन रोजी अयोध्येला जाणार होते, पण राज्यसभेच्या निवडणुकीमुळे ते 15 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. तेव्हा आता 15 जुन चलो अयोध्या हा नारा आहे.
आपल्या तोफा नेहमीच धडधडत असतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मोठा दारू गोळा घेऊन आले आहेत. आमचा बाप हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र कधीही झुकणारी नाही हेच आजची सभा सांगतेय. आपल्याला संघर्ष करावा लागत आहे पण संघर्षापुढेच जीत आहे. या महासागराने महाआरती वाचायला सुरुवात केली तर हनुमान चाळीसा म्हणायला सुरुवात केली तर लडाख मधले चीनचे घुसलेले सैन्य पण घुसले आहे तेही मागे जाईल.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना केलेल्या काळातील आणि सरकार आल्या पासुन सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले आणि प्रत्येकाने काळजी कशी घ्यायची हे कुटुंब प्रमुखांनी दाखवुन दिल्याचे सांगितले. कुठेही कोणी डोळे झाकून बसलो नाही, आपलं नेतृत्व संवेदनशील आहे त्याला बळ द्यायचे आहे. घर पेटवणारे काही जण आहेत पण आम्ही चूल पेटवतो असे सांगत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
मंत्री एकनाथ शिंदेम्हणाले आपले हिंदुत्व प्रखर विचाराचे आहे, ही बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेली गर्दी आहे. गर्व से काहो हम हिंदू है कोणत्याही परस्थितीत मागे हटतील ते बाळासाहेब कसले अगदी पाकिस्तान सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना घाबरत होता. बाबरीआंदोलनात शिवसेना सक्रिय राहीली, धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट दिली होती, बॉम्ब स्फोटाच्या वेळी मुंबई शांत करायचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना म्हणजे काय तर 'अपनी हीफाजत करनि है तो शिवसने मे आना' कोरोना कामात केलेल्या कामाची आपल्या लोकांनी पसंती दिली, शिवसेनेचा विचार यांचा खापर पंजोबा आला तरी कोणी संपवू शकत नाही. शिवसेना एक विचार आहे ते बाळासाहेब यांचे विचार आहेत. ते संपत नाहीत तोपर्यंत शिवसेना संपू शकत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर कोणाला घेणेदेणे नाही महागाईवर कोणी बोलायला तयार नाही तोतरे तातरे बोलत सुटले आहेत. ते अंगावर आले तर त्यांना शिंगावर घ्यावे लागेल शिवसेनेच्या आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल.
मंत्री सुभाष देसाईयांनी, दुपारी बारा पर्यंत झोपून राहतो, अन भोंग्याचा त्रास होतोय असे सांगतो, असे उदाहरण देत राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. महागाई वाढतेय त्यावर कोणी बोलत नाही, सरकारने रोजगार देण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत ३ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. कोरोना मागे शिवसेना पुढे येतेय राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रोजगार मेळावे सुरू केले आहेत स्वयंरोजगार योजना आखली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना असून बँकेतून कर्ज मिळवून देत आहोत आम्ही कर्जासाठी हात वर केलेले नाहीत, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमटा काढला.
हेही वाचा : CM Uddhav Thackeray on BJP : ..तर हे दाऊदलाही भाजपमध्ये घेतील, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल