मुंबई- मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 442 रुग्ण आढळून आले असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 44 हजार 704 वर तर मृतांचा आकडा 1 हजार 465 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1442 नवे रुग्ण आढळलेत, एकूण आकडा 44 हजार 704वर - Corona people death mumbai
मुंबईमधून आज 626 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 18 हजार 98 वर पोहोचला आहे.
![मुंबईत कोरोनाचे 1442 नवे रुग्ण आढळलेत, एकूण आकडा 44 हजार 704वर कोरोना आढावा मुंबई, corona patient mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:36-mh-mum-04-mumbai-corona-7205149-04062020203536-0406f-1591283136-598.jpg)
मुंबईमधून आतापार्यंत 18 हजार 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 25 हजार 141 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. 48 मृतांपैकी 33 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष आणि 15 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 24 जणांचे वय 60 वर्षावर तर 18 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. दरम्यान, मुंबईमधून आज 626 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.