मुंबई - मुंबईत 1,430 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 31,789 वर पोहोचला आहे, तर 38 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1,026 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1,430 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 31,789 वर - मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के महिला, तर 60 टक्के पुरुष रुग्ण आहेत. तसेच मृतांमध्ये 37 टक्के महिला, तर 63 टक्के पुरुष असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के महिला, तर 60 टक्के पुरुष रुग्ण आहेत. तसेच मृतांमध्ये 37 टक्के महिला, तर 63 टक्के पुरुष असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1430 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
38 मृत्यूंपैकी 27 जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष, तर 12 महिला रुग्ण आहेत. मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय 40 वर्षाखाली, 15 जणांचे वय 60 वर्षावर, तर 20 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान आहे. मुंबईमधून 330 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 8,404 वर पोहोचला आहे. मुंबईत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के महिला, तर 60 टक्के पुरुष रुग्ण आहेत. मृतांमध्ये 37 टक्के महिला, तर 63 टक्के पुरुष असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.