महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mega Block : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी १४ तासांचा मेगाब्लॉक; 'या' रेल्वे गाड्या रद्द - Netravati Express

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी  ठाणे ते दिवा  स्थानकांदरम्यान  डाउन जलद मार्गांवर १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला ( Megablock on Central Railway ) आहे. हा मेगाब्लॉक रविवारी (दि. २३ जानेवारी ) मध्य रात्री १ वाजून २०  मिनिटांपासून ते रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यत असणार आहे. या काळातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळपत्रकांत बदल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 19, 2022, 10:40 PM IST

मुंबई-मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गांवर १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला ( Megablock by Central Railway ) आहे. हा मेगाब्लॉक रविवारी (दि. २३ जानेवारी ) मध्य रात्री १ वाजून २० मिनिटांपासून ते रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यत असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

असा आहे १४ तासाचा मेगाब्लॉक -मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉकसह अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक ठाणे-दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांशी संबंधित पूर्वीच्या अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यासाठी घेणार आहे. रविवारी मध्यरात्री 01.20 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा आणि रविवार दुपारी 12.30 वाजलेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 2 तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दादर येथून शनिवारी (दि. 22 जानेवारी) रात्री 11.40 वाजल्यापासून ते रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत सुटणार्‍या जलद उपनगरी व मेल तसेच एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.

  • शनिवार या गाड्या रद्द -
  1. 17618 नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस
  2. 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस
  3. 12140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • रविवारी या गाड्या रद्द-
  1. 22105 / 22106 मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस
  2. 22119 / 22120 मुंबई – करमळी - मुंबई तेजस एक्सप्रेस
  3. 11007 / 11008 मुंबई – पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  4. 17617 मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस
  5. 12071 / 12072 मुंबई – जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  6. 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
  7. 12139 मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • पनवेल येथे थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या
  1. 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (शुक्रवारी सुटणारी )
  2. 12052 मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ( शनिवारी सुटणारी)
  3. 10112 मडगाव - मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस ( शनिवारी सुटणारी)
  • पनवेलहून सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या -
  1. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ( रविवारी सुटणारी)
  2. 12051 मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ( रविवारी सुटणारी )
  3. 10103 मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेस ( रविवारी सुटणारी)

ABOUT THE AUTHOR

...view details