महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jaipur Mumbai Train Firing: जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण; चेतन सिंहला न्यायालयीन कोठडी, नार्को चाचणीची याचिका फेटाळली - Chetan Singh Narco Test

जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने जीआरपीची नार्को चाचणीची याचिका फेटाळली आहे.

Jaipur Mumbai Train Firing
जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण

By

Published : Aug 12, 2023, 7:40 AM IST

Updated : Aug 12, 2023, 10:41 AM IST

मुंबई :मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 31 जुलै रोजी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती.जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेनमध्ये एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह चार जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला जीआरपीने शुक्रवारी तिसर्‍यांदा बोरिवली न्यायालयात रिमांडसाठी हजर केले होते. मात्र न्यायालयाने चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने जीआरपीचा अर्ज फेटाळला : जीआरपीच्या वतीने तक्रारदार पक्षाने ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने चेतनला या सर्व चाचण्यांना सहमती आहे का, असे विचारले असता चेतनने कोर्टाला तो सहमत नसल्याचे सांगितले. जी स्वाक्षरी घेण्यात आली आहे. ती त्याच्यावर दबाव टाकून स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर न्यायालयाने जीआरपीचा अर्ज फेटाळला. याप्रकरणी जीआरपीने 125 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चेतनने प्रवाशांच्या हत्येचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. 31 जुलैला चेतन सिंहला अटक केल्यानंतर एक ऑगस्टला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पहिल्या रिमांडवेळी सात ऑगस्टपर्यंत चेतन सिंहला पोलीस कोठडी ठोठावली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आज न्यायालयाने चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


ट्रेनच्या डब्यांची पाहणी : 31 जुलै रोजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमार सिंहने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांची हत्या केली होती. याप्रकरणी रेल्वे पोलीस तपास करत आहेत. गोळीबाराची घटना जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये घडली होती. ही रेल्वे मुंबईतील सेंट्रल कारशेडमध्ये ठेवण्यात आली आहे. या रेल्वेच्या ज्या डब्ब्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, त्या डब्ब्यांची पुन्हा तपासणी जीआरपीकडून करण्यात आली. बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या जीआरपी पथकाने या डब्ब्यात जाऊन घटना कशी घडली, याचे दृश्य रिक्रिएट केले.


चेतन सिंहने कशा झाडल्या गोळ्या : गुन्ह्याची घटना रिक्रिएट करण्यात आली, तेव्हा मुख्य साक्षीदार आणि रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जेथे वरिष्ठ, सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यावर गोळी झाडण्यात आली. तसेच या रेल्वेच्या वेगवेगळ्या बोगीतून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहने कशा गोळ्या झाडल्या? याची घटना तयार करण्यात आली. परंतु घटनेचे दृश्य पुन्हा तयार करत असताना आरोपी चेतन सिंह हजर नव्हता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.


हेही वाचा :

  1. Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील घटना कशी घडली? जीआरपीने गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा केला उभा
  2. Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार, आरोपी चेतन सिंहची पोलीस कोठडी वाढवली
  3. Jaipur Mumbai Train Firing: चेतन सिंहच्या साहित्यिक भाषेमुळे गोळीबाराचे कारण उलगडेना! ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत होणार चौकशी
Last Updated : Aug 12, 2023, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details