मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज 1 हजार 372 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजार 942 वर पोहोचला आहे. आज 41 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 841 वर झाला. तसेच 350 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या 6 हजार 466 वर पोहोचली आहे.
मुंबईत कोरोनाचे 1372 नवे रुग्ण, 41 जणांचा मृत्यू - मुंबई कोरोनाबाधितांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 372 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1222 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत, तर 17 ते 18 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 150 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 372 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1222 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत, तर 17 ते 18 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 150 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत झालेल्या 41 मृत्यूंपैकी 26 मृत्यू गेल्या 24 तासात झाले आहेत, तर 15 मृत्यू 6 ते 15 मे दरम्यान झाले आहेत. या 15 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचा अहवाल बाकी होता. हा अहवाल आल्यावर त्याची नोंद आजच्या मृतांमध्ये करण्यात आली आहे. 41 मृतांपैकी 32 जणांना दिर्घकालीन आजार होते. यामध्ये 29 पुरुष, तर 12 महिला रुग्ण होते. मृतांपैकी एकाचे वय 40 वर्षाखाली, 18 जणांचे 60 वर्षावर, तर 22 जण 40 ते 60 या वयोगटातील होते.