मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेले दोन दिवस एक हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 1 हजार 362 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 348 दिवस
मुंबईत आज 1 हजार 362 रुग्ण आढळून आले. त्यामुळे, कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 1 हजार 266 वर पोहचला आहे. आज 34 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 742 वर पोहचला आहे. 1 हजार 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाऱ्यांची संख्या 6 लाख 56 हजार 446 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 943 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 348 दिवस इतका आहे.
हेही वाचा -पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज