मुंबई : केंद्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक राज्याला किती निधी मिळाला त्यात कोणती कामे केली जाणार आहेत याची माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बोलत होते. यावेळी बोलताना, राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १३ हजार ५३९ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे. २००९ ते २०१४ या काळात १ हजार १७१ कोटी रुपये मिळतात होते. यात अकरा पटीने वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा रेल्वे प्रकल्पाचा कामाला जोरदार गती दिली असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
यासाठी करण्यात आली तरतूद :राज्यासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते १३ वर २४ डब्याची गाडी उभी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याकरिता २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पनवेल-कळबोली कोचिंग टर्मिनस फेज- १ टप्पा १ साठी १० कोटी, बडनेरा वंगण दुरुस्तीसाठी ४० कोटी, रत्नागिरी रोलिंग स्टॅक कारखान्यासाठी ८२ कोटी, रेल्वे मार्गिकेचे नूतनीकरण करण्यासाठी १४०० कोटी, पुलाचे तसेच बोगद्यांच्या कामासाठी ११३ कोटी, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशसाठी २३७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे आहे.
तरतुदींमध्ये भरघोस वाढ :राज्यासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी मध्य रेल्वेला यंदा १०,६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेला ७२५१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मागील अर्थसंकल्पापेक्षा ४६ टक्के अधिक आहे. २००९ ते २०१४ या काळात १ हजार १७१ कोटी रुपये मिळत होते. यात ११ पटीने वाढ झाली आहे.