मुंबईत- वडाळा आयमॅक्सजवळ असलेल्या गिरनार हाईट्स या १८ मजली इमारतीच्या गच्चीवरून १३ वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रियान चक्रवर्ती असे या मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
वडाळ्यात इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या - सायन रूग्णालय
बुधवारी माटुंगा परिसरात अशोक सावला या ५३ वर्षीय व्यक्तीने शांती निकेतनच्या १३ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा वडाळा आयमॅक्सजवळ असलेल्या गिरनार हाईट्स या १८ मजली इमारतीच्या गच्चीवरून १३ वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केली आहे.
बुधवारी माटुंगा परिसरात अशोक सावला या ५३ वर्षीय व्यक्तीने शांती निकेतनच्या १३ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा १३ वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केली आहे.
दरम्यान, वडाळा टिटी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रियानचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविले आहे. रियान चक्रवर्ती याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. आत्महत्येपूर्वी रियान हा त्याच्या आईसोबत घरात होता. त्यानंतर तो घराबाहेर पडून इमारतीच्या गच्चीवर गेला आणि इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.