मुंबई -मुंबईमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्याचप्रमाणे सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमधील रुग्णांची संख्याही वाढत आहे. धारावीत सध्या 13 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना दिल्ली निजामुद्दीन येथील मरकझ कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगीमुळेच कोरोनाची लागण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
कोरोना : दिल्ली मरकझ प्रकरणामुळेच धारावीतील सर्व 13 रुग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत कोरोनाचे 696 रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या धारावीत 13 रुग्ण आढळून आले आहेत. या 13 पैकी 4 जुने रुग्ण आहेत. या 4 जुन्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. धारावीत 4 रुग्ण आढळून आले होते. हे रुग्ण ज्या विभागात आढळले तो भाग प्रतिबंधित विभाग म्हणून घोषित करण्यात आला.
मुंबईत कोरोनाचे 696 रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या धारावीत 13 रुग्ण आढळून आले आहेत. या 13 पैकी 4 जुने रुग्ण आहेत. या 4 जुन्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. धारावीत 4 रुग्ण आढळून आले होते. हे रुग्ण ज्या विभागात आढळले तो भाग प्रतिबंधित विभाग म्हणून घोषित करण्यात आला. या विभागात पालिकेकडून शोध मोहीम राबवण्यात आली असता त्या ठिकाणी नवीन 4 रुग्ण आढळून आले आहेत. तर, एक रुग्ण धारावीच्या सोशल नगरमध्ये आढळून आला आहे.
धारावीत याआधी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धारावीत एका डॉक्टरला तसेच सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची लागण कशामुळे झाली, याचा शोध घेतला असता दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज प्रकरण सामोरे आले आहे. मरकझ मधील सहभागी लोकांनी धारावीत एकाकडे पाहुणचार घेतला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत धारावीत आढळून आलेले सर्व रुग्ण दिल्ली निजामुद्दीन प्रकरणामुळे बाधित झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.