मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून शिवाजीनगर परिसरामध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईत 13 किलो प्रतिबंंधित औषध जप्त; एनसीबीची कारवाई - मुंबईत प्रतिबंधित औषध जप्त
पोलिसांना मलिककडून सिकंदर हुसेन सय्यद या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सय्यदच्या घरी छापा टाकला असता त्यांना त्याच्या घरातून तब्बल १३ किलो कोडेन सिरप हे प्रतिबंधित औषध आढळून आले.
कोडेन सिरप हे प्रतिबंधित औषध जप्त
मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी येथील परिसरात राहणाऱ्या नूर आलम नूर इस्लाम मलिक गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मलिककडून तब्बल २०३ ग्रॅम गांजा आणि १० ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याबरोबरच पोलिसांना मलिककडून सिकंदर हुसेन सय्यद या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सय्यदच्या घरी छापा टाकला असता त्यांना त्याच्या घरातून तब्बल १३ किलो कोडेन सिरप हे प्रतिबंधित औषध आढळून आले. तसेच या दोन्ही आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून राशीद सिकंदर सय्यद या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.