महाराष्ट्र

maharashtra

आज...आत्ता....गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

पाक पंतप्रधानांशी हस्तांदोलन? छे..! नजरेला नजरही भिडवली नाही..पवार-ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट. मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार. Cricket World Cup : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द, दोन्ही संघांना १-१ गुण

By

Published : Jun 14, 2019, 12:04 AM IST

Published : Jun 14, 2019, 12:04 AM IST

आज...आत्ता....गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

पाक पंतप्रधानांशी हस्तांदोलन? छे..! नजरेला नजरही भिडवली नाही..

बिश्केक - पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकारी संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे उपस्थित आहेत. येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले नाही की, एकमेकांना नजरेला नजरही दिली नाही. वाचा सविस्तर

पवार-ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची आज मुंबईत खासगीरित्या भेट घेतली. पवार आणि ठाकरे घराण्यांच्या वारसदारांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. वाचा सविस्तर

मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला

मुंबई - नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून बाळ चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाचा सविस्तर

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार

पुणे - भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. जीव वाचवण्यासाठी धावत असताना रस्त्यावर पडल्याने खंडेलवाल जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर

Cricket World Cup : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द, दोन्ही संघांना १-१ गुण

नॉटिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नसून एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्याची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details