मुंबई : मुंबई शहरात बनावट कागदपत्राच्या आधारे सिमकार्ड एक्टीव्ह करणाऱ्यांविरुध्द DoT, भारत सरकार यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे, कारवाई करण्यात आलेली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे, Telecom Services Providers (TSPs) यांच्याकडून माहिती प्राप्त करून मोबाईल धारकाचे फोटो व त्यांची माहिती यांचे विश्लेषण केले. काही व्यक्ती हे स्वतः चे वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटोचा वापर करून बनावट आधारकार्ड तयार करून, ते खरे असल्याचे भासवले. त्याचा वापर काही टेलिफोन कंपन्यांनी त्यांना विश्वासाने सोपविलेली सिमकार्ड अॅक्टीव्ह करून ते स्वतःच्या फायदयासाठी वितरित केल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
१३ आरोपींना अटक: त्याबाबत मुंबई शहरातील वि. प. मार्ग पोलीस ठाणे, डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मलबार हिल पोलीस ठाणे, सहार पोलीस ठाणे, डी बी मार्ग पोलीस ठाणे व बांगुर नगर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद केले. वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार केले. विविध ठिकाणी कारवाई करून एकुण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 13 आरोपींविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४६५, ४६७, २४६८, ४७१, ३४ अन्वये वेगवेगळे ०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कॉल सेन्टर मालकास अटक:पोलीस तपासादरम्यान विविध संगणकीय साधने ४ लॅपटॉप, ६० मोबाईल्स ०२ डेमो कार्डस् असे जप्त करण्यात आले असून या कारवाई दरम्यान विविध सिमकार्डस् विक्रेते आणि पी.ओ. एस. एजन्टस् यांना अटक करण्यात आली आहे. तसेच तेथे डम्मी सिमकार्डचा वापर करून चालविणाऱ्या कॉल सेन्टर मालकास देखील अटक करण्यात आली आहे.