महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या'तारखेनंतर सुरू होणार दहावी अन् बारावीच्या परीक्षा - वर्षा गायकवाड

यंदा इयत्ता 12 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर होईल तर इयत्ता दहावीची परीक्षा 1 मेनंतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड

By

Published : Jan 3, 2021, 9:38 PM IST

Updated : Jan 3, 2021, 9:43 PM IST

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी (दि.3 जाने.) इयत्ता 12 वीच्या परिक्षा 15 एप्रिलच्या पुढे होतील तर 10 वी राज्य मंडळाच्या परीक्षा 1 मेनंतर साधरण अपेक्षित आहे, अशी माहिती दिली. यामुळे दहावी बारावीच्या एप्रिल आणि मे दरम्यान परिक्षा होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

15 जानेवारीपर्यंत शाळा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून शाळा बंद आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर राज्यात काही ठिकाणी 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती . मात्र, ब्रिटनमधील कोरोनाचा नवीन स्ट्रेन विषाणूमुळे मुंबईमधील शाळा येत्या 15 जानेवारीपर्यंत सुरू करणार नाही, असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुंबईमधील शाळा सुरू झाल्यास 15 जानेवारीनंतर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

10 वी, 12 वी वर्ग

रविवारी (दि. 3 जाने.) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यंदा इयत्ता 12 वी परिक्षा 15 एप्रिल पुढे होईल तर 10 वी राज्य मंडळ परीक्षा 1 मेनंतर साधरण अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. सीबीएससी (केंद्रीय) बोर्ड प्रमाणे 15 एप्रिलनंतर बारावी आणि 1 मेनंतर 10वीची परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, असे मंत्री गायकवाड म्हणाल्या.

आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा

यापूर्वीच 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेत असताना ब्रिटनमधून कोरोनाचा नवा विषणू आल्यामुळे आणखी थोडे दिवसांची वाट बघून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. पुढचा टप्पा पाचवी ते आठवीपर्यंत टप्पा पूर्ण विचार करून सुरू करणार आहोत. राज्यातील परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा -कोरोना विरोधातील युद्धात मुंबई पालिकेने खर्च केले 1 हजार 632 कोटी

हेही वाचा -शिवसेना 'ईडी'विरोधात आंदोलन करणार नाही - संजय राऊत

Last Updated : Jan 3, 2021, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details