महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊन: बारावीच्या सर्व पुस्तकांचे मिळणार पीडीएफ... - लाॅकडाऊन मुंबई बातमी

यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली असून ती अद्यापही कोरोनाच्या संकटामुळे बाजारात उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही पुस्तके बाजारात उपलब्ध झाले नसले तरी आम्ही पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ, अशी माहिती कालच दिली होती.

12th-all-pdf-books-available-on-balbharti-website
12th-all-pdf-books-available-on-balbharti-website

By

Published : Apr 8, 2020, 12:42 PM IST

Updated : Apr 8, 2020, 1:48 PM IST

मुंबई- राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालभारतीने बारावीच्या सर्व अभ्यासक्रमाची पुस्तके आज दुपारनंतर पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुस्तके दिवसभरात टप्प्या-टप्प्याने बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत. त्यावरुन पुस्तके घेण्यात यावेत, असे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा-न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू

यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली असून ती अद्यापही कोरोणाच्या संकटामुळे बाजारात उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही पुस्तके बाजारात उपलब्ध झाले नसले तरी आम्ही पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ, अशी माहिती कालच दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बालभारतीने यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज दुपारपर्यंत ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली.

बालभारतीकडे यापूर्वीच ई-बालभारती व्हर्रच्युअल क्लासरुम आधी प्रकल्पाचे काम सुरू आहे. अनेक अभ्यासक्रमाची पुस्तके हे पीडीएफ स्वरुपात उपलब्ध केले जात असतात. मात्र, यावेळी बारावीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने ही पुस्तके वेळेत वितरकांकडे पोहोचली नाहीत. यामुळे आज पुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहितीही गोसावी यांनी दिली.

http://ebalbharati.in/main/publicHome.aspxया संकेस्थळावर पुस्तके उपलब्ध आहेत

Last Updated : Apr 8, 2020, 1:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details