मुंबई - येथे शुक्रवारी नवीन 1 हजार 297 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 117 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 हजार 287 वर पोहचला आहे, तर मृतांची संख्या 4 हजार 177 झाली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबई कोरोना अपडेट : शुक्रवारी 1 हजार 297 नवीन बाधितांची नोंद तर 117 जणांचा मृत्यू
मुंबईमधून शुक्रवारी 593 जण कोरोनातून बरे झाले. आतापार्यंत 39 हजार 744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत सध्या 28 हजार 366 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईमधून शुक्रवारी 593 जण कोरोनातून बरे झाले. आतापार्यंत 39 हजार 744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत सध्या 28 हजार 366 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी ज्या 117 जणांचा मृत्यू झाला त्यापैकी 44 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 73 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 117 मृत्यूपैकी 88 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 80 पुरुष आणि 37 महिला रुग्ण होत्या. तसेच या मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 69 जणांचे वय 60 वर्षांवर तर 41 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 55 टक्क्यांवर पोहचला आहे. 18 ते 24 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.72 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 41 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 756 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 5 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आले आहेत, अशी माहितीही पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.