महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1269 नवे रुग्ण... 114 जणांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत शुक्रवारी नव्याने 1269 रुग्ण आढळून आले आहेत. तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 55 मृत्यू 16 ते 18 जूनचे तर 59 मृत्यू 15 जून पूर्वीचे आहेत. मृतांपैकी 79 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते.

1269-new-corna-cases-found-in-mumbai
मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1269 नवे रुग्ण...

By

Published : Jun 20, 2020, 2:28 AM IST

मुंबई- मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवे 1269 रुग्ण आढळून आले असून 114 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 64068 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 3423 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 32257 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने, मुंबईत सध्या 28388 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत शुक्रवारी नव्याने 1269 रुग्ण आढळून आले आहेत. तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 55 मृत्यू 16 ते 18 जूनचे तर 59 मृत्यू 15 जून पूर्वीचे आहेत. मृतांपैकी 79 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 78 पुरुष आणि 36 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 9 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 55 जणांचे वय 60 वर्षावर तर 50 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

तर 401 रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 32257 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 12 ते 18 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 2.15 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 33 दिवसांवर पोहोचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details