महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेस्टच्या ताफ्यात नवीन १२५० बसेस दाखल होणार - इलेकट्रिक एसी बस

आर्थिक घाट्यात असणाऱ्या उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने १,२५० मिडी, मिनी आणि इलेक्ट्रीक एसी बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रवाशांना चांगली आणि जलद सेवा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.

बसेस

By

Published : Aug 6, 2019, 10:20 AM IST

मुंबई - आर्थिक घाट्यात असणाऱ्या उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी बेस्टने ४०० एसी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आणखी १,२५० मिडी, मिनी आणि इलेक्ट्रीक एसी बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट प्रवाशांना चांगली आणि जलद सेवा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.

बेस्टच्या ताफ्यात नविन बसेसचा भरणा...

बेस्टवर २५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज कमी करण्यासाठी पालिका बेस्टला आर्थिक मदत करत आहेत. ही मदत मिळवण्यासाठी प्रवासी भाडे कमी करून भाडेतत्वावर बसेस घेण्याच्या सूचना पालिकेने बेस्टला केल्या होत्या. त्यानुसार बेस्ट ४०० एसी बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. बेस्टकडे ४०० पैकी १०० बसेस आल्या आहेत. तसेच बेस्टकडे सध्या १० इलेक्ट्रिक बसेसही आल्या आहेत. त्या आरटीओच्या परवानगीनंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रस्त्यावर उतरवल्या जातील, असे पाटणकर यांनी सांगितले.

बेस्ट प्रवाशांना आणखी चांगली व वातानुकूलित सेवा देता यावी म्हणून आणखी १२५० बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० मिनी एसी, ५०० मिडी एसी. २५० मिडी इलेकट्रीक बसेस समावेश आहे. या बसेससाठी टेंडर काढण्यात आले असून पुरवठादाराला या बसेस सहा महिन्याच्या आत बेस्टला द्याव्या लागणार आहेत. बेस्टकडे सध्या ३३०० बसचा ताफा असून या बसेस आल्यावर हा ताफा ४००० चा होणार आहे. बसचा ताफा १० हजार करण्याचा आमचा उद्देश असल्याचे पाटणकर यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details