महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात 1201 नवे रुग्ण, 32 रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 1201 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 05 हजार 51 वर पोहचला आहे. तर आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 60 वर पोहोचला आहे. आज 1370 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 38 हजार 395 वर पोहोचला आहे.

mh corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Oct 26, 2021, 9:35 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज मंगळवारी 26 ऑक्टोबरला 1201 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 32 मृत्यूंची नोंद झाली असून 1370 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

22,981 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 1201 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 05 हजार 51 वर पोहचला आहे. तर आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 60 वर पोहोचला आहे. आज 1370 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 38 हजार 395 वर पोहोचला आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 20 लाख 80 हजार 203 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.64 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 76 हजार 191 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 22 हजार 981 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा -एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638, 20 ऑक्टोबरला 1825, 21 ऑक्टोबरला 1573, 22 ऑक्टोबरला 1632, 23 ऑक्टोबरला 1701, 24 ऑक्टोबरला 1410, 25 ऑक्टोबरला 889, 26 ऑक्टोबरला 1201 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 293
अहमदनगर - 180
पुणे - 100
पुणे पालिका - 64

ABOUT THE AUTHOR

...view details